नमस्कार,
ईस्ट बे मराठी मंडळ (EBMM) आपल्या मुलांसाठी घेऊन येत आहे एक आगळी वेगळी मराठी शाळा.
ईस्ट बे मराठी मंडळ (EBMM) मराठी शाळेची उद्दिष्टे अशी असतील:
मराठी भाषेची गोडी निर्माण करणे
इतरांशी (आजी, आजोबा ) संवाद साधणे
मराठी भाषा बोलणे, वाचणे, लिहिणे
भाषेचे आकलन होणे
इतर कुटुंबियांबरोबर मराठी कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणे
भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून मूल्यमापन आणि प्रमाणपत्र
Important Dates
School Year (2024 - 2025)
First Day: Aug 18, 2024
Last Day: May 18, 2025
Calendar (Updated - 8/15/2024)
शाळेची काही वैशिष्ट्ये:
बृहन महाराष्ट्र मंडळाने ६० पेक्षा अधिक शाळांत राबवलेला यशस्वी अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाच्या रचनेतून अनुभवात्मक शिक्षण: रचनात्मक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक उपयोगिता यांचे योग्य संतुलन
वय वर्षे ६ आणि पुढे
वय आणि क्षमतेनुसार गट -वर्गीकरण (शिशु ते ४ थी इयत्ता असे ५ वर्ग)
इतर संबंधित उपक्रम:
खेळ
सहली
EBMMच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण
नाविन्यपूर्ण स्पर्धा
श्लोक, स्तोत्रे, कविता, नाटूकल्यांच्या सहाय्याने संस्कार आणि शिक्षण