ढोलावरती भिडता टिपरू
झांज थिरकली गर्जे ताशा
साद मराठी मना घालता
आसमंत बे धुंद जाहला !!
Background
Maharashtrians like us have grown up with the rich tradition of Dhol-Tasha. We have enjoyed, participated and experienced the energy of dhol tasha. Like all of us, we want to preserve this rich tradition of Maharashtra and Bay-Dhund is our effort towards it.
Now as parents to kids growing here in American culture, we often question - what legacy, culture, tradition our next generation will carry with them that identifies them as Maharashtrians? We strongly believe that the excitement, fun, pride, the cool factor, and everything that Dhol-Tasha represents are ideal ways to engage with our next generation living here. We want to bring the next generation into this journey and give them this essence of culture and tradition as part of their identities in the future. Just like the legacy of Bhangra,Garba/Dandiya, we hope to take Dhol-Tasha to the next generation.
We know our dream is too grand but we also know we can only bring it into reality if we all get your support. Join us and be part of this. We welcome everyone who is interested in Maharashtrian traditions.
पार्श्वभूमी
महाराष्ट्रामध्ये वाढलेले आमच्यासारखे बरेच जण ढोल ताशा बघत, ऐकत आणी वाजवत लहानाचे मोठे झाले. आपल्यापैकी बहुतेकांप्रमाणेच आम्हीही ढोल ताशा हि आपल्या मराठी संस्कृतीची परंपरा समजतो आणि म्हणून Bay-धुंद उपक्रमातून जपायचा प्रयत्न करत आहोत.
आता अमेरिकेतील शालेय विद्यार्थ्यांचे पालक ह्या नात्याने आमच्यासारख्यांना असा प्रश्न पडतो कि आपली पुढची पिढी स्वतःला महाराष्ट्रीयन, मराठी म्हणून खरंच ओळखते का? ती पिढी कोणता मराठी वारसा, संस्कृती, परंपरा सोबत घेऊन परदेशांत त्यांचे आयुष्य जगेल? आमचा ठाम विश्वास आहे की ढोल ताशामध्ये असा अभिमानास्पद जोश, अशी बेधुंद मस्ती आणि मजा आहे, कि ज्यामुळे पुढची पिढी आनंदाने ह्यामध्ये समाविष्ट होईल, एकत्र येईल, मराठी संस्कृती जपेल आणि कदाचित वाढवेल पण. आम्हाला पुढच्या पिढीला ढोल ताशा ने त्यांची स्वतःचीच त्यांना मराठमोळी ओळख करून द्यायची इच्छा आहे. जर भांगड्याचा व गरभा/दांडियाचा वारसा पुढे जाऊ शकतो, तर तसेच आपण ढोल ताशाचे करू शकतो.
आमची स्वप्ने खूप मोठी आहेत, पण ती पूर्ण होण्याकरता, तुम्हां सर्वांची साथ हवी आहे. या, ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. महाष्ट्राच्या परंपरेत रुची असणाऱ्या सर्वांना हे आवाहन आहे.
Group Vision
Promotion of Maharashtrian culture and traditions
Preserving the essence of Maharashtrian culture and tradition for the next generations living abroad
पथक ध्यास
महाराष्ट्राच्या संस्क्रुतीचा प्रचार आणी प्रसार
अमेरिकेत वाढलेल्या पुढच्या पिठीला महाराष्ट्राच्या संस्क्रुतीचा ठेवा
Group Goals
Setup and successfully run Dhol-Tasha Pathak locally in Tri-Valley of San Francisco Bay Area and the surroundings.
Get multiple generations involved but with a clear focus on providing next-generation both participation and leadership opportunities.
पथक ध्येय
बे एरिया ट्राय व्हॅली परिसरामध्ये वाद्य पथक चालविणे
सर्व पिढ्यांना सहभागी करून घेणे व विशेष करून पुढच्या पिढीला समावून घेऊन नेतृत्व संधी उपलब्ध करून देणे