माणूस कुठेही गेला तरी आपल्या देशाशी, त्या
संस्कृतीशी आणि मातृभाषेशी जुळलेली त्याची नाळ कधी तुटत नाही.
उलट या सगळ्यापासून तो जितका दूर परकियांच्या मुलुखात जाऊन राहतो
तेव्हा ही ओढ अधिकच जाणवू लागते. आज शेकडो भारतीय
व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झाले असले तरी आपली संस्कृती,
आपली मातृभाषा ते विसरलेले नाहीत. आजही गोऱ्यांच्या देशात साजरी
होते आहे दिवाळी. दिवाळीच्या निमित्ताने परदेशातील सर्व
महाराष्ट्र मंडळांनी भरघोस कार्यक्रम आखले आहेत आणि दिवाळीच्या
सेलिब्रेशनची आपल्या इतकीच तिथेसुद्धा जय्यत तयारी झाली आहे.
लंडनमधील काही महाराष्ट्र मंडळांच्या यावषीर्च्या दिवाळी
सेलिब्रेशनवर टाकलेली ही एक नजर ...........
क्रॉयडन
मराठी सर्कल, ग्रेटर लंडन :- लंडनमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन
स्थापन केलेल्या या संस्थेने 'दिवाळी सेलिब्रेशन' चा कार्यक्रम
13 नोव्हेंबर रोजी आखला आहे. क्रॉयडन येथील सेंट ऑगस्टाईन सेंटर
मध्ये होणाऱ्या या सेलिब्रेशनच्या निमित्ताने गाणी, नृत्य,
कविता, स्नेहसंमेलन असे धम्माल कार्यक्रम होणार आहेत. या
कार्यक्रमात प्रमुख आकर्षण असणार आहे ते चिवडा-चकलीचं. यात
आपल्या इथे असतो अगदी तसाच सर्व प्रकारचा फराळ वाटण्यात येणार
असून याशिवाय रांगोळी, पणत्या, आकाशकंदिलांनी संपूर्ण सभागृह
सजविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता फटाके वाजवून करण्यात
येणार आहे. फराळ झाला की सगळ्यांनी एकत्र येऊन फटाके वाजविण्याचा
वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मित्र - युके
:-
लंडनमधील 'मित्र युके' या संस्थेने दिवाळी सेलिब्रेशन
12 नोव्हेंबर रोजी आयोजित केले असून यानिमित्ताने स्नेहभोजनाचे व
मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
महाराष्ट्र मंडळ -
लंडन :-
न. चिं. केळकर यांच्या पुढाकाराने 1932 साली
स्थापन झालेले लंडनमधील महाराष्ट्र मंडळ हे आजही एक नामांकित
संस्था म्हणून
लंडनमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीच्या
अस्मितेचा अभिमान जागविणाऱ्या या मंडळाने दरवषीर्प्रमाणेच
यंदादेखील दिवाळीनिमित्त कार्यक्रमांची आखणी केली आहे.
धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी (ता.29) 'मदासीने
केला मराठी भ्रतार' आणि 'घर माझे वळणामागे' या दोन एकांकिका सादर
होणार आहेत. दिवाळी डिनर अॅण्ड डान्स हा कार्यक्रम 19 नोव्हेंबर
रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी मनोरंजानाचे विविध
कार्यक्रम होणार आहेत.
न्यू इंग्लंड मराठी मंडळ :-
मंडळाने यावषीर् 'फ्युजन' ही संकल्पना आखली असून 'आनंद
मेळा' हे दिवाळीच्या कार्यक्रमांचे आणखी एक आकर्षण असणार आहे.
'फ्युजन' या संकल्पनेवर आधारित विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर
करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था व कलाकारांना संधी
देण्यात येणार आहे.
ईस्ट बे मराठी मंडळ (कॅलिफोनिर्या)
:-
ईस्ट बे मराठी
मंडळाने यंदा दिवाळी सेलिब्रेशनसाठी 'एन्करेज अवर ओन लोकल
टॅलेंट' ही संकल्पना आखली असून कॅलिफोनिर्यात राहणाऱ्या मराठी
माणसात कोणकोणत्या कला दडल्या आहेत त्या शोधण्याचा व त्या कलेला
प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
दिवाळी सेलिब्रेशनचा हा विशेष कार्यक्रम 5 नोव्हेंबर रोजी
प्लिझंटन येथे साजरा होणार आहे. याशिवाय रांगोळी स्पर्धा,
आकाशकंदील बनवा स्पर्धा, लक्ष्मीपूजन असे कार्यक्रम दिवाळीत
मंडळातफेर् घेण्यात येतील.
महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजेलिस
:-
मंडळाने दिवाळीचा भरगच्च कार्यक्रम आखला असून 5
नोव्हेंबर रोजी लेकवूड येथील हॉवर मिडल स्कूलमध्ये कार्यक्रम
होणार आहे. यात रांगोळी स्पधेर्पासून ते नृत्य, नाच, गाणी अशा
अनेक कलांचा संगम असणार आहे. 'फराळ स्पर्धा, 'स्टॅन्डअप कॉमेडी',
'विनोदी एकांकिका' आणि 'दिवाळी दांडिया' ही यावषीर्च्या
सेलिब्रेशनची खास आकर्षण आहेत.
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
:-
मंडळाने 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी स्नेहसंमेलन आयोजित
केले आहे. सकाळी फराळाची मेजवानी, मग मुलांसाठी विविध स्पर्धा,
श्री तशी सौ स्पर्धा, गाण्याची स्पर्धा असे वैविध्यपूर्ण
कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
- मनिषा